श्री गणपती मंदिर हे तरसोद, नशिराबाद,मुरारखेडा(उजाळ्गाव) या तीन गावांच्या सिमे समोर तरसोद शिवारात वसलेले भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे मंदिर असून श्री.रा.रा.द.ग.काळे, इतिहास संशोधक मेंबर स्टेट बोर्ड फॉर हिस्टॉरिकल रेकॉर्ड आणि एन्शंट मोन्युमेटस् , मुंबई दि.०९/०३/१९७८ रोजी ग्राम पंचायत तरसोद येथील व्हिजीट बुकात मंदिर पुरातन असल्याची नोंद केलेली आहे.
सदर मंदिर इ.स.१६६२ साली मुरारखेडा येथील मोरेशवर हणमंत देशमुख यांनी बांधलेले आहे. पद्मालयाचे सिद्ध पुरुष श्री.गोविंद महाराज, आळंदी देवाची येथील सिद्ध पुरुष श्री.नरसिहं सरस्वती स्वामी महाराज तसेच नशिराबादचे शिवयोगीराज श्री झिपरु अण्णा महाराज मंदिर परिसरात दर्शन घेण्यासाठी यायचे कधी कधी शेगांवचे श्री गजानन महाराज, श्री झिपरु अण्णा महाराजाना भेटायला यायचे तेव्हा दोघे योगिराज अवलिये मंदिराकडे वायुवेग भ्रमण करून गुजगोष्टी करोनी सुख निद्रा घेत होते. वरील सर्व साधूसंत महात्मे जप-तप, होमहवन, अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तने करून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झलेले भूमी आहे . मंदिरासमोरच्या परिसरात वड चिंचेची मोठी पुरातन झाडे व मंदिरामागे पायविहीर पायऱ्या बुजून टाकलेल्या स्थितीत आहे . त्या गोष्टी पुरातन असल्याची साक्ष देतात.
मराठयांच्या व पेशव्यांच्या फौजा जेव्हा उत्तरेस मुलूखगिरी करनेस जात असत तेंव्हा मुरारखेडा तरसोद परिसरात थांबत असत मुलूखगिरी कामगिरी निर्विघ्नपणे पार पडावी या इच्छेने आपल्या फौजाबरोबर आलेले मराठे सरदार व स्वतः पेशवे सुद्धा मंदिरात दर्शनासाठी यायचे असे सांगितले जाते. मंदिरासमोरील नाल्यामध्ये आलेले पुरात त्यांचा हत्ती वाहून गेल्यामुळे ह्या नाल्यास हातेड नाला असे नाव पडले आहे. दरोज व दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीस व अंगारिका योग या दिवशी येणाऱ्या चतुर्थीस हजारो भाविकांचे दर्शनासाठी मोठी गर्दीहोतअसते. दरवर्षाच्या कार्तिक शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेस यात्रा भरते. माघ शुद्ध तिलकुंद चतुर्थीस जन्म दिवस साजरा करण्यात येतो व विविध धार्मिक कार्यक्रम साजरा केले जातात.
सन १९८० साली ट्रस्ट स्थापन झलेनंतर कै. पुना उखा अलकरी व त्यांच्या भावांनी ३६ आर शेत जमीन संस्थानास दान दिलेले आहे. संस्थानाने १ हेक्टर ९८ आर शेत जमीन खरेदी केलेली आहे. आजमितीस एकूण २ हेक्टर ३४ आर जमीन संस्थानच्या मालकीची आहे. हातेड नाल्याच्या पुरापासून मंदिराचा बचाव व्हावा म्हणून लांब व उंच असा धक्का बांधणेत आला आहे. मुळ पुरातन मंदिराला मार्बल बसवून जिर्णोद्धार करून शेजारी मोठा ओटा व मंदिराचे प्रांगण फरसबंद केलेले आहे. समोर शिवपंचायतन महादेव,मारोती व एकवीरादेवी मंदिराचे बांधकाम,दिवाबत्ती पाणी पुरवठा टाक्या,संडास-मुताऱ्या,भव्य(आर.सी.सी.हॉल),पत्रीहॉल,भक्तानचे,दर्शन सुरळीत व्हावे यासाठी बऱ्या, स्वयंपाकासाठी शेड,शॉपिंग साठी गाळे कार्यालय व स्पेशल रूम,वाहने लावणेसाठी पर्किंगची सोय तसेच तरसोद फाट्यावर भव्य असे पुरातन शिल्प पद्धतीचे प्रवेशव्दार उभारण्यात आलेले आहे. निसर्गरम्यता व पर्यावरण वृद्धीसाठी मागील परिसरात विवध प्रकारचे झाडे लावलेले आहे. रिटायर्ड तहसिलदार श्री मोतीराम बुलाखी भिरूड साहेब रा. चिनावल यांनी त्यांच्यापत्नी कै सुशीलाबाई यांचे स्मरणार्थ ५०*३० फुटांचा (आर.सी.सी.हॉल) बांधून दिलेले आहे.
Recent Comment